अखेर खासदार अनिल बोंडेंविरुद्ध गुन्हा दाखल; राहुल गांधींबाबतचं ‘ते’ वक्तव्य भोवलं

अमरावती : भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणे भोवले आहे. काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.१८) डॉ. बोंडे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धमकी देणे आणि इतर व्यक्ती विरोधात वादग्रस्त बोलणे या अंतर्गत बोंडे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत विधान केले होते. “देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यावर आरक्षण रद्द करण्याचा विचार करता येऊ शकतो,” असं विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजप, बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि भाजपच्या इतर काही मित्रपक्षांनीही राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करणे सुरू केले.

Advertisement

भाजप खासदार अनिल बोंडेंनी ‘”राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. त्यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत,” असं खळबळजनक विधान केलं आहे. अनिल बोडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत. मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत. जे भारतातील बहुसंख्याक नागरिकांच्या भावना दुखावतात. त्यांना किमान जाणीव तरी करून दिली पाहिजे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page