पुण्यात वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेळ्या भागातून दररोज अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करुन कोयत्याचा धाक दाखविण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महेश विलास लोणकर (वय ३१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई किरण झेंडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई झेंडे आणि मेमाणे कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात बुधवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी शिवनेरीनगर परिसरात कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी साेडविण्यासाठी झेंडे आणि मेमाणे गेले. त्यावेळी गर्दीत कोयता उगारुन आरोपी महेश लोणकर वाहनचालकांना धाक दाखवित होता. या भागातील रहिवाशांना त्याने शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच झेंडे आणि मेमाणे तेथे गेले.

पोलिसांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांना पाहताच लोणकरच्या पत्नीने त्याच्याकडील कोयता काढून घेऊन लपविला. कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणकर याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या लोणकर दाम्पत्याचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page