दोन अल्पवयीन मुलांकडून 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; खंडाळा तालुक्यातील संतापजनक प्रकार

शिरवळ : एक मोठी बातमी समोर आली आहे. खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पाच वर्षीय बालिकेवर मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शिरवळ पोलिसांनी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत एका गावात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना सोमवारी (दि. १६) रोजी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र यावेळी आरोपींनी पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवून संबंधित दोन्ही नराधम आरोपीना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून शिरवळ परिसरातील एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुले शेजारी राहतात. चार वर्षीय मुलगी संबंधित मुलांकडे खेळायला जात असे. रविवारी (दि.१५) रोजी पिडीत व आरोपी हे एकत्र खेळत असताना पीडितेला आरोपींनी घराच्या टेरेस वर नेत मोबाईल मधील अशील क्लिप पहात अत्याचार करण्याचा केला या नंतर झालेली घटना पीडितेने आपल्या आईला सांगितली. याबाबत शिरवळ पोलिसांना माहिती मिळाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती घेतली व आपली तपासचक्र फिरवत आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर पीडित मुलीच्या आईने शिरवळ पोलीस स्टेशन या ठिकाणी याबाबत तक्रार दाखल केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली .पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page