मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवली; कारणही आलं समोर

पुणे : एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्य सरकारची योजनादूत ही योजनादेखील थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबवण्यासंबंधी नोटीस जारी केली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून ही योजना तुर्तास थांबण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं सरकारने असं का केलंय हे जाणून घेऊयात.

निवडणूक होईपर्यंत नाही मिळणार निधी

Advertisement

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. त्यानुसार, महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेला दिला जाणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिला लाभार्थ्यांना मिळणार नाहीत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page