अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, दारू घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर

नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. आज (१३ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून हा जामीन मिळाला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांना 10 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. केजरीवाल यांना हा जामीन काही अटी-शर्थींवर देण्यात आला आहे. त्यामध्ये केजरीवाल यांना कोणत्याही साक्षीदाराशी बोलता येणार नाही.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




