मोठी बातमी : महायुतीला मोठा धक्का; महादेव जानकर महायुतीतून बाहेर

मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन २४ तासांचा अवधीही झाला नाही, तोच महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केलीय. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात आपल्या पक्षाला विचारात घेतलं गेलं नसल्याच्या कारणाने महादेव जानकर यांनी हा निर्णय घेतलाय.

महादेव जानकर हे राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्यावर ठाम आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची जास्त शक्यता आहे. महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु होती. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारलं जात नाही, अशी महादेव जानकर यांची खंत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारात घेतलं जात नसल्यामुळे महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

महादेव जानकर यांना धनगर समाजाचा मोठा पाठिंबा आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये महादेव जानकर यांच्या पक्षाची ताकद आहे. महादेव जानकर यांची सोलापूर, बारामती, मराठवाड्यातील काही भाग, परभणी, बीड, जालना आणि कर्नाटक लगतच्या प्रदेशात मोठी ताकद आहे. जिथे धनगर समाजाची संख्या जास्त आहे तिथे महादेव जानकर यांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देणं हे महायुतीला डोकेदुखी ठरु शकतं. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करता भाजपला महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात यश येतं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page