समीर वानखेडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात; कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. एनसीबीचे अधिकारी असताना समीर वानखेडे यांची कारकिर्द विविध कारणांनी गाजली होती. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावर समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे अधिकच चर्चेत आले होते.
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली जात आहे. ते मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून, अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी लाच मागितल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता ते समीर वानखेडे निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




