डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादितविश्वविक्रमी 668 वा अंक प्रकाशित..!

डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित
विश्वविक्रमी 668 वा अंक प्रकाशित!
पुणे : 13 मार्च 2025
विश्वविख्यात संपादक, साहित्यिक आणि विचारवंत
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी
संपादित केलेल्या डहाळी ह्या
विश्वविक्रमी अनियतकालिकाचा अंक
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या जिल्हा प्रमुख पदाधिका-यांच्या विशेष बैठकीत मान्यवरांच्या शुभहस्ते
प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी दादासाहेब फाळके
चित्रपट युनियनचे प्रदेश
सरचिटणीस स्वप्नील तलाठी ,
वरिष्ठ उपाध्यक्ष गोरख अहिरे , उपाध्यक्ष आरती बाबर , जिल्हा कार्याध्यक्ष सोनिया गोळे, शहर अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे , शहर उपाध्यक्ष वसुधा नाईक
आदि मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.मधुसूदन घाणेकर हे दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे जिल्हा सल्लागार आहेत. त्यांना 2025चा दादासाहेब फाळके चित्रपट
युनियनचा बेस्ट ॲक्टर हा
सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. डाॅ.घाणेकर यांच्या साहित्य , संपादन क्षेत्रातील प्रदीर्घकालिन कारकिर्दीस
51 वर्ष पूर्ण झाली आहेत.
डाॅ.घाणेकर डहाळी हे अनियतकालिक 2006 पासून
काढतात. विना प्रायोजक , विना जाहिरात , विना वर्गणीदार ..अशा निरपेक्षपणे
हा अंक डाॅ.घाणेकर काढतात.
हा अंक देशविदेशात गौरवला गेला आहे.डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना डहाळी अंकाच्या मौलिक योगदानासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून
सर्वाधिक काळ अनियतकालिक काढणारे संपादक म्हणून त्यांच्या नावावर विश्वविक्रम आहे.
डाॅ.घाणेकर हा अंक पूर्णपणे
स्वतःच्या हस्ताक्षरात काढतात. त्यात त्यांची स्वलिखित कविता असते , स्वतः व्यंगचित्र देखिल काढतात. दिव्यांग आणि
वंचित तसेच नवोदितांसाठी
डाॅ.घाणेकर प्राधान्य देतात.
शेकडो प्रतिभावंतांना डहाळी
अंकसाठी त्यांनी हे व्यासपीठ
उपलब्ध करुन दिले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page