विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती; 3 माजी मुख्यमंत्री व 3 माजी उपमुख्यमंत्र्यांवर जबाबदारी

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

विदर्भासाठी छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी टी. एस. सिंगदेव व एम. बी. पाटील तर उत्तर महाराष्ट्रासाठी डॉ. सय्यद नासीर हुसेन व डी. अनसुया सिथक्का यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक व अविनाश पांडे हे या निवडणुकीसाठी वरिष्ठ समन्वयक असतील असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page