शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

अमरावती : अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या इनोव्हा कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. काल, सोमवार 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्यापूर येथील मूळ रहिवासी असलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष गोपाल अरबट अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी धावत्या कारवर म्हणजे त्यांच्या इनोव्हा गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सुदैवाने कोणाचेही नुकसान किंवा जिवितहानी झालेली नाहीय. तरी अचानक करण्यात आलेल्या या गोळीबारामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडीवर तीन राउंड फायर करण्यात आले, वलगाव पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार केली असून, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




