वाघोलीत कारचा मोठा अपघात; एका तरुणाचा जागीचं मृत्यू

पुणे – वाघोली-लोहगाव रस्त्यावर भरधाव कार उटलून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, कार चालक तरुण जखमी झाला आहे. अनुपम महेश असेरकर (वय २३, रा. वाघोली अग्निशमन केंद्राजवळ, नगर रस्ता) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात कार चालक देव पटनाईक (वय २३, रा. विजयविहार हाऊसिंग सोसायटी, वाघोली) जखमी झाला आहे. या अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी देव पटनाईक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनुपम याची आई सीमांतनी महेश असेरकर (वय ५४) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनुपम व देव मित्र आहेत. दोघे एकाच सोसायटीत राहत होते. गुरुवारी पहाटे कारमधून ते वाघोली-लोहगाव रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात चहा प्यायला गेले होते. चहा पिऊन परत असताना वाघोली-लोहगाव रस्त्यावर डीमार्टजवळ समोरुन जात असताना भरधाव ट्रक येत होता. रस्त्यावर अंधार होता. त्यामुळे देव याला समोरुन येणाऱ्या ट्रकच्या अंदाज आला नाही. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. यात अनुपम गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अनुपम आणि देवला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपाचरादरम्यान अनुपम याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक खटके तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




