पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात?; पोलीस आयुक्तांच्या पत्राने खळबळ

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांशी संबधित अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं, अनेक कारवाया देखील करण्यात आल्या. अशातच पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. सतत गर्दीने गजबजणाऱ्या “त्या” हॉटेलला पत्र लिहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धोका असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका हॉटेलला नोटीस बजावली आहे. त्यामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याचा इशारा देऊन कारभार सुधारण्याचे आवाहन केले आहे. सतत गर्दी होत असल्यामुळे या हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेकदा नोटीस बजावल्या आहेत. हॉटेलमधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला आहे. या हॉटेलमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा घालत असतात. सध्या अतिरेकी कारवाया बाबत अलर्ट आहे. एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून त्यातून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा पोलिसांनी पत्राद्वारे दिला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




