महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा; ‘या’ तारखेला होणार मतदान

मुंबई – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.

महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्रे आहेत. २६ नोव्हेंबर आधी राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. तर राज्यात एकूण ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे प्रयत्न असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले. मतदान केंद्रावर मतदानासाठी न जाऊ शकणाऱ्यांसाठी घरातून मतदानाची सुविधा करून देण्यात येणार आहे.

Advertisement

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम कसा असणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page