हडपसर भागात “व्हाईट पर्ल स्पा” मध्ये चालु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकुन ०३ महिलेची सुटका व ०१ पुरुष आरोपीस केले अटक..!

दिनांक १२/०२/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी गोपनीय माहितीवरून ” व्हाईट पर्ल स्पा” दुसरा मजला, दशमेश कॉम्पलेक्स, प्रणाय हॉटेल, हडपसर गाडीतळ, पुणे सोलापुर रोड, हडपसर, पुणे येथे मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असलेबाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे सहयाने सदर बातमीची खात्री करुन “व्हाईट पर्ल स्पा” येथे छापा टाकुन आरोपी स्पा मॅनेजर १) सौरभ शामराव इंगळे, वय २८ वर्षे, रा. लक्ष्मीमाता मंदीर काळेपडळ हडपसर पुणे व स्पा मालक यांनी वेश्याव्यवसायासाठी “व्हाईट पर्ल स्पा “मध्ये आणलेल्या ०३ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली.

Advertisement

सदर प्रकरणी नमुद आरोपीं विरुध्द दि. १२/०२/२०२६ रोजी हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. १०५/२०२६ भा.न्या.स. कलम १४३ (१) (३), ३ (५) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. श्री. शंकर खटके, पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, रेश्मा कंक व भुजबळ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page