राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर 9 MM पिस्तूलने गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्याच्या निमित्त फटाके वाजवण्यात येत होते. याचवेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. 6 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली?

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली, असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वा अधिकृत व्यक्तीने माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाची किनार आहे. दुसरीकडे सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने तपास करत आहेत.

Advertisement

कोण होते बाबा सिद्दीकी ?

तीन वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबार मुत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची खास ओळख आहे. बाबा सिद्दीकी यांनी आपली राजकीय कारकीर्द भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरू केली आणि जवळपास पाच दशके राजकारणात सक्रिय राहिले. अलीकडेच त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली होती. 2013 मध्ये आयोजित एका इफ्तार पार्टीत, त्याने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील अनेक वर्षांपासूनची दुरावा संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page