बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई – माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर 9 MM पिस्तूलने गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्याच्या निमित्त फटाके वाजवण्यात येत होते. याचवेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. 6 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
पुढे ते म्हणाले,”या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे,” अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे.…
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




