महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; ट्विट करुन म्हणाल्या…

मुंबई : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात हॅकर्सने आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं आहे. तसेच त्या हॅकर्सकडून आदिती तटकरे यांच्या फेसबुक अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह पोस्टही करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे. आदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
“नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




