पिंपरी- चिंचवड मध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा; सँडविच- चटणी खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या

पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखं झाल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.
ब्रेड सँडविच आणि चटणीतून 350 मुलांना विषबाधा
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना अल्पोपारामध्ये ब्रेड सँडविच आणि चटणी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ब्रेड आणि सँडविच चटणी खाल्ल्यावर त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. काही मुलांना जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या. शाळा प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर शाळा प्रशासनाने काही मुलांना घरी पाठवले. तसेच ज्यांची प्रकृती खालावली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपरी शहरातील शाहूनगर परिसरातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




