पुण्यातील गुलटेकडी परिसरात दोन भावांनी केली तरुणाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

पुणे : पुण्यात दिवसाढवळ्या खून, गोळीबार अन् बलात्काराच्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एक थरारक हत्या झाली आहे. सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शहरातील हडपसर गुलटेकडी परिसरात मध्यरात्री सरोदेची हत्या करण्यात आली आहे.
सुनील सरोदे या तरुणाची गुंडांनी हत्या केली आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट परिसरात राहतो. तर सुनीलची हत्या करणारे दोन्ही गुन्हेगार, रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे मोक्यातील जामिनीवर सुटलेले आहेत. तर यांनीच सुनीलची हत्या केली असल्याचं समोर आलंय. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुनील सरोदे, रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे तिघेही मित्र आहेत. सहा जुलैला आरोपी रोहनचा वाढदिवस होता. त्यावेळी सरोदेने त्याला मारहाण केली होती. याचाच राग दोन्ही कांबळे बंधूंच्या मनात होता. याच रागातून मंगळवारी रात्री कांबळे बंधू त्याच्या घरी गेले. त्यांनी सुनील सरोदेचा भाऊ गणेश सरोदेला मारहाण सुरू केली. त्यावेळी सुनील मध्ये आला आणि तेव्हा आरोपींने कोयता काढून त्याच्या गळ्यावर वार केला. रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे दोघेही नुकतेच जामिनावर बाहेर आलेले आरोपी आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




