पुण्यात ५०० रुपयाच्या २५० बनावट नोटा जप्त; तरुणाला अटक

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या चिंचवडमधील तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. तरुणाकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
निलेश हिरानंद वीरकर (वय ३३, रा. विष्णू गावडे चाळ, चिंचवड रेल्वे स्थानकासमोर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने बनावट नोटा कोठून आणल्या, यादृष्टीने तपास सुरु आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल पवार, महेश मंडलिक गस्त घालत होते. त्यावेळी पीएमपी थांबा परिसरातून वीरकर गडबडीत निघाला होता. पवार आणि मंडलिक यांना संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरु केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या. चौकशीत नोटा बनावट असल्याचे आढळून आले. वीरकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




