बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे: बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील तीन पैकी एका तरूणाला अटक केली आहे. तर इतर दोघांचा तपास सुरू आहे. घटनास्थळ आणि आसपासच्या काही काही किलोमीटर परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू होता. त्यातील एकाला पुण्यातून तर इतर दोघांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या तिघांची सखोल चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




