बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपींची माहिती देणाऱ्याला मिळणार १० लाखांचे बक्षीस

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांकडून दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामुहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टीफिशियल इंटलिजन्स) वापर करण्यात येणार आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आरोपींची माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुण्यासह सोलापूर, तसेच सातारा जिल्ह्यातील सराइतांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीचे ‘एआय’तंत्रज्ञानाच्या आधारे विश्लेषण करण्यात येणार आहे. बोपदेव घाटातील टेबल पॉईंट परिसरात महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला गुरुवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. तरुणीवर आरोपींनी अत्याचार केला. आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबू आणि रक्त आढळून आले. पोलिसांनी रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




