राष्ट्रीय समाज पक्ष पुण्यातील किती जागा लढविणार? ; शहराध्यक्ष बालाजी पवार म्हणाले…

पुणे : विधानसभा निवडणुक लवकरच होणार आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला जोरादार सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यातील विविध मतदारसंघात दौरे सुरु आहेत. तसेच उमेदवारांची चाचपणीही केली जात आहे. तसेच अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलतांना दिसून येत आहे, पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी भाजप आणि कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला.

Advertisement

धनकवडी येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला. यावेळी पर्वती विधानसभा अध्यक्षपदी अक्षय खर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी पुण्यातील ८ मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढविणार असा दावा केला आहे.

बालाजी पवार काय म्हणाले?

पुण्यात रासपची मोठी ताकद आहे, पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाने अनेक कामे केली आहेत, त्यामुळे आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी व्यक्त केला. तसेच मी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे, महादेव जानकर यांनीही तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला मतदारसंघात रासपची मोठी ताकद आहे. ओबीसी, धनगर समाज तसेच महादेव जानकर यांना मानणारा मोठा गरीब मराठा वर्ग आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page