उच्चभ्रू सोसायटीमध्ये दुध टाकणाच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणा-या चोरट्यास केले जेरबंद..!

दिनांक १७/०१/२०२६ रोजी अॅमिनन्स बाय नाईकनवरे, न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर पुणे या उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहणारे सुर्यनारायण राजरतिलम यांचे राहते घरामधुन १,३२,०००/- रुपये चोरी झालेबाबत त्यांनी तक्रार दिल्यावरुन विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.३१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१ (३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर बाबत तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील पोलीस स्टाफ यांनी सदर सोसायटी मधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सदर फुटेज मध्ये दिनांक १७/०१/२०२६ रोजी पहाटे ०५/३० वा.चे सुमा. दुध देण्यासाठी येणारा इसम सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत होता. सदर इसम नामे व्यंकटेश वसंत करंडे, वय ३४ वर्षे, रा. जय विश्वकर्मा सोसायटी, रुम नं. २ विदयानगर वडगावशेरी पुणे. यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केल. दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये नमुद आरोपी याने चोरी केलेली १,३२,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु क-हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, अभयकुमार नागटिळक, शंकर वाघुले व सना शेख यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page