खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई – काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा मुलगा गणेश हांडोरे याने काल रात्री एक दुचाकी स्वराला स्वत:च्या कारने ऊडवून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गणेशला अटक केली आहे. मात्र त्याची शुगर वाढल्याने त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर जखमी गोपाळ वर झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गोवंडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

गणेश हंडोरे यांनी आपल्या कारने चेंबूरजवळ दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गोपाळ आरोटे नावाचा तरुण जखमी झाला. कारच्या धडकेने गोपाळ रस्त्यावर पडला पण त्याला उपचारासाठी दाखल करण्याऐवजी गणेश हंडोरे याने तिथून पळ काढला. यानंतर शनिवारी हंडोरेविरोधात गोवंडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेश हंडोरेला अटक केली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page