घरफोडी करणारे सराईत आरोपींस मुद्देमालास केले जेरबंद..!

बाणेर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात दि.०८/०९/२०२५ रोजी सकाळी ११/०० ते दुपारी १३/०० वा च्या सुमा. लेन नं ११, विरभद्रनगर, बाणेर पुणे येथील फिर्यादी यांचे राहत्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या परवानगी शिवाय चोरीच्या उद्देशाने कशाच्यातरी सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन फिर्यादीच्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र व ५०,०००/-रोख रक्कम लुबाडीच्या इरादयाने चोरुन नेल्याने बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २०८/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१ (३),३०५ (अ), ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Advertisement

सदर दाखल गुन्हयातील आरोपीचा बाणेर तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत, सीसीटीव्ही फुटेज चेक करुन काळेवाडी पिंपरीचिंचवड येथुन आरोपी क्र. १) साहील रविंद्र वाघमारे वय २३ वर्ष रा. हरदेव कॉलनी विजय नगर, काळेवाडी सन १०८ पुणे २) शाकिब छोटू शेख वय २६ वर्ष रा. संजय गांधीनगर काळेवाडी ब्रिजजवळ, गुप्ता किराणा स्टोअर्स जवळ पुणे यांना दि.१७/०९/२०२५ रोजी अटक करुन नमुद आरोपीच्या ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेली स्पेंल्डर मोटार सायकल व तसेच चोरी केलेल्या रक्कमेपैकी ३८,०००/-रु. रोख जप्त करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे ३) चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे, वय-२७ वर्षे, रा. विजयनगर, अल्फान्सो शाळेसमोर, माया मार्केटजवळ, साई गोटा, काळेवाडी, पुणे यास दि. १४/११/२०२२५ रोजी नमुद गुन्ह्यात अटक करुन सदर गुन्ह्यामध्ये चोरीस केलेले सोन्याचे मंगळसुत्र जप्त करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. अटक आरोपी क्र ३ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. मनोज पाटील, शहर, मा.पोलीस उप-आयुक्त, परि.४ श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस पुणे शहर, निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती अलका सरग, सपोनि कैलास डाबेराव, सपोनि गणेश रायकर, पोउपनि दिपाली पाटील, पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, रोहीत पाथरुट, मराठे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page