जन्मदात्या पित्याकडून 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे : सांस्कृतीक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून गुन्हेगारीच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. असं असतानाच बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा उलगडा शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आला आला आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नराधम बापाला पुणे पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित शाळेकडून गुड टच बॅड टच या कार्यक्रमाद्वारे मुलींचे समुपदेशन केले जाते होते. तेव्हा शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या पिडित मुलीचे समुपदेशन सुरू असताना तिने वडिलांकडून जबरदस्तीने मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून वारंवार शारीरीक संबंध ठेवले जात असल्याचे सांगितले. गेल्या एक वर्षामध्ये त्यांनी हा प्रकार वारंवार केल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर शिक्षिकांनी पोलिसांकडे धाव घेतली. नंतर हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक ओलेकर करीत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page