वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी मेहुणे अन् बहिणींना केली अटक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तसेच पुर्व वैमन्यातून हा गोळाबीर झाल्याचेही सांगण्यात येत आहे. वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. रविवारी रात्रीच्या साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते नानापेठ परिसरात काही कामासाठी उभे होते. त्यावेळी काहीजण त्याठिकाणी आले, त्यांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला, कोयत्याने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून फरारही झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कौटुंबिक वादातून हत्या
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी पुण्यातील नाना पेठेत हत्या झाली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चौघांना अटक
पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर याचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर अन् कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे. हत्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले आहे. त्यात एकूण १२ हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवर आल्याचे दिसत आहे. गाडीवरुन उतरताच वनराज आंदेकर यांच्या दिशेने त्यांनी गोळीबार सुरु केला. आंदेकर जखमी होताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




