संतापजनक! बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

पुणे : पुण्यात मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी याप्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यांसह तिघांना अटक केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत एका २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर तिला बोपदेव घाटात नेण्यात आले. त्यानंतर तिघा मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली असून तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काल गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात देखील घेतली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page