पुणे शहरात दहशत माजविण्याचे सत्र सुरुचं; हडपसर भागात टोळक्याकडून वाहनाची तोडफोड

पुणे : वादातून टोळक्याने नऊ वाहनांची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळ परिसरात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी साहिल कांबळे याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक उद्धव झगडे (वय २४, रा.स्वराज पार्क, म्हसोबा मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर ) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, कांबळे आणि झगडे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. झगडे रागाने बघत असल्याने कांबळे आणि साथीदार काळेपडळ भागात सोमवारी दुपारी आले. त्यांनी शिवीगाळ करून परिसरात दहशत माजविली. लाकडी दांडके उगारून धमकावले. त्यानंतर दांडक्याने दोन दुचाकींसह टेम्पो, रिक्षांच्या काचा फोडल्या. दगडफेक करून कांबळे आणि साथीदार पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कांबळेला रात्री उशीरा पकडले. तर, त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page