दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असणारा “बचक्या” टोळीतील सराईत आरोपीस केले जेरबंद..!

दिनांक ११/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस पथक आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मा. वरीष्ठांचे आदेशान्वये पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गुप्त बातमीदारा मार्फतीने माहिती मिळाली की बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील १) गु.र.नं.३५२/२०२५, भा. न्या. सं. कलम ३१० (४), ३१० (५) आर्म. एक्ट क. ४ (२५), महा. पोलीस अधिनियम कलम. ३७ (१),३७ (३), २) गु.र.नं.३५०/२०२५, भा.न्या.सं. ३ (५), ३०९ (६) या गुन्हयांतील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे राजेश उर्फचौपाट्या बबलू मंगल मंडळ, वय २९ वर्ष, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, मूळ रा. दरबंगा, बिहार राज्य हा अंगर वाईन या ठिकाणी थांबल्याची माहिती मिळाल्याने लागलीच सापळा रचुन पोलीस अंमलदार यांनी नमुद आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईकामी बंडगार्डन पो. स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमूद आरोपी हा “चौपाटी राजा” नावाने कुप्रसिद्ध असुन दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी करणारी सराईत “बचक्या” टोळीशी संबंधीत असुन सध्या तो मोक्का गुन्ह्यात जामिनावर होता.

Advertisement

सदर आरोपीवर यापुर्वी दाखल गुन्हे १) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ८१/२०१३, भा.द.वि.क. ३७९, २) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २५९/२०१३, भा.द.वि.क. ३२६,३२३,५०४,५०६, ३) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २२४/२०१४, भा.द.वि.क. ३७९,५११,३४ ४) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ५८/२०१६, भा.द.वि.क. ३७९,३४ ५) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २४४/२०१७, भा.द.वि.क. ३२४, ३५४(अ), ५०६ ६) बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. १४३/२०२१, भा.द.वि.क. ३९५.३९७,३२३,५०६ ७) लष्कर पो.स्टे. गु.र.नं. १९२/२०१७, भा.द.वि.क. ३२४,३२३,५०४,३४ ८) विश्रामबाग पो.स्टे. गु.र.नं. ३३७/२०११, भा.द.वि.क. ४६०,३४

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ कडील सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, कॉप्स २४ मार्शल अंमलदार तुळशीदास जाधव व महेंद्र आगळे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page