मंत्री छगन भुजबळांना धमकीचा फोन; आरोपीला घेतले ताब्यात

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. भुजबळांना मोबाईलवर मॅसेज करुन अश्लील शिवीगाळ करण्यात आली आहे. नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Advertisement
रवीद्र यशवंत धनक असे धमकी देणाऱ्या संशयिताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. धमकी देणारा रवीद्र धनक हा नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039
Advertisement




