पुण्यातील रास्ता पेठेत ११ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

पुणे : बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. रास्ता पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून १० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुदसर इलियास बागवान (वय ४०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि अन्वर शरफुद्दिन शेख (वय ३८, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

राज्य शासनाने पोलगुटखा वाहतूक, विक्रीवर बंदी घातली आहे. छुप्या पद्धतीने गुटखा विक्री, तसेच वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक नितीनकुमार नाईक आणि पथक रास्ता पेठेत गस्त घालत होते. रास्ता पेठेतील एका सोसायटीत दोघांनी गुटखा, पानमसाल्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख ८४ हजार ७१६ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव, उदय राक्षे यांनी ही कारवाई केली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page