एकाला कत्ता मारुन केले गंभीर जखमी; उदगीरमधील धक्कादायक प्रकार

उदगीर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणावर कत्ता मारुन गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

जखमी झालेल्या तरुणाने याप्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे, तो म्हणाला की, काल माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला, बारचा मालक सत्यनारायण बिलालाल यांनी माझ्यावर पूर्वी गुन्हा दाखल केला होता, त्यातील दोन साक्षीदार मी जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेलो असता तेथे आले, त्यांनी मला थांबवल आणि तुला जिवे मारण्यासाठी सत्यनारायण यांनी सांगितलं आहे, मागच्यावेळी तू वाचला आता वाचणार नाही, असे म्हणत कत्त्याने हल्ला केला. या हल्ल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी जखमी झालेल्या तरुणाने केली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- भारती सुर्यवंशी (उदगीर)

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page