महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्याचा खून; कारण वाचून बसेल धक्का

बारामती – पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख सुरुच असताना आता बारामतीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बारामतीमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांचा खून महाविद्यालयाच्या परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दूसरा आरोपी फरार आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थव पोळ (वय १७) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अर्थव पोळ हा बारावीत शिकत होता. तुळजाराम चतुरचंद (टी. सी) महाविद्यालयात शिक्षण घेत होता. कॉलेजच्या बाहेर आज सकाळी सर्व विद्यार्थी जमले होते. त्यावेळी अर्थव पोळ व त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपींनी अथर्व वर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार एक महिन्यांपूर्वी अर्थव आणि आरोपींमध्ये दुचाकीला कट मारण्यावरुन वाद झाला होता. या कारणावरून आज सकाळी त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून अथर्वची हत्या करण्यात आली आहे.

आज अथर्व कॉलेजमध्ये आला असता आरोपी आणि त्याची बाचाबाची झाली. दोघेही हमरीतुमवरीवर आले. याच वेळी आरोपींनी अर्थव पोळवर कोयत्याने वार केले. या घटनेत अथर्व गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी पळून गेले. अर्थवला तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page