मोका गुन्हयातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद..!

मोका गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन कायदेशीर करवाई करणेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट २, अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर व अमोल रसाळ व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत होते. सदर पेट्रोलींग दरम्यान पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुभार व विजय पवार यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३/२०२५ भा.न्या.सं.क.१०३,१०९,१२६(२),३५२,३(५) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेट कलम ७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (i),३ (२) व ३(४) गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे रुपेश राजन केंद्रे वय १९ वर्ष रा. सच्चाईमाता मंदिर अटल नंबर १३, टॉवर शेजारी जैन मंदिर कात्रज, पुणे याचा शोध घेवुन त्यास शिताफिने सच्चाई माता पाण्याचे टाकीजवळ, आंबेगाव खुर्द येथे ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा.अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर अति. कार्यभार (गुन्हे) श्री. विवेक मासाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अंजुम बागवान, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, शंकर नेवसे, संजय जाधव, निखिल जाधव, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, ओमकार कुंभार, संजय आबनावे व विशाल भिलारे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page