माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या गाडीचा भीषण अपघात; पिकअपने दिली धडक

संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहारात राहणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात संजना जाधव आणि गाडीचा चालक हा थोडक्यात बचावला आहे.

Advertisement

एका पिकअप गाडीने समोरुन संजना जाधव यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे ही अपघाताची घटना घडली. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीदेखील बचावासाठी धाव घेतली. यावेळी गाडीतील संजना जाधव आणि त्यांच्या गाडीचा चालक सुखरुप असल्याची माहिती समोर आली. तसेच संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page