वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपीला अटक

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसानी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यात आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने आज अटक केली. अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (वय 24, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, देशमुखवाडी, शिवणे) असे आरोपीचे नाव आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा संख्या २१ झाली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.
वनराज आंदेकरांचा खून टोळी युद्धातून झाला. त्यासाठी वापरलेली पिस्तुले मध्यप्रदेशातून आणली गेली होती. अभिषेक खोंड याने मध्यप्रदेशातून पिस्तूल आणण्यासाठी आरोपी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. वनराज आंदेकरांचा खून झाल्यावर अभिषेक प्रसार झाला होता. या कालावधीत त्याला कोणी आश्रय दिला तसेच आर्थिक मदत केली, त्याने आणखी काही पिस्तुले आणली आहेत का, त्याची कोणाला विक्री केली, आदी बाबींचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




