पुण्यात नदी पात्रात आढळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ उकललं; खूनाच कारण…

पुणे : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खराडी भागात मुळा, मूठा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली. तरुणीच डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. त्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. संपत्तीच्या वादातून या महिलेची तिच्या भावाने आणि वाहिनीने हत्या केल्याचं उघडं झालं आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सकिना खान असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अशपाक खान आणि वहिनी हमीदा अशी आरोपींची नावे आहेत. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ व वहिनीने सकीनाची हत्या केली. घरातच शास्त्राच्या साह्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत तिचा मृतदेह संगमवाडी नदीपात्रात फेकून दिला होता. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली.
कसा झाला हत्येचा उलगडा
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. पुण्यातील पाटील इस्टेट भागत सकिना भाऊ आणि वाहिनी सोबत राहत होती. ज्या खोलीत ते राहत होते ती सकिना हिच्या नावावर होती. तिच्या भावाने सकिना हिला खोली नावावर करून देण्यास सांगितले होते. दरम्यान, तिने खोली नावावर करून देत नसल्याने त्याने तिची हत्या केली. यानंतर घरातच तिच्या मृतदेहांचे तुकडे करून ते नदीपात्रात फेकून दिले. यानंतर सकिना ही घरातून निघून गेल्याच बनाव त्यांनी रचला. बरेच दिवस सकिना दिसली नसल्याने शेजऱ्यांचा संशय बळावला. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दिली. पोलिस धड नसलेल्या मृतदेहाचा शोध घेत असतांना बेपत्ता नागरिकांची माहिती घेत होते. यातून हा प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान व वहिनी हमीदा यांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. सकिना ही खोली नावावर करून देत नसल्याने तसेच तिला ते घरातून निघून जाण्यास सांगत असतांना देखील ती जात नसल्याने त्यांनी तिचा खून केला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




