पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग आजपासून सुरू; तिकीट किती?

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून प्रवाशांसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले असून संध्याकाळी 4 वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे 4 मेट्रो स्थानके आहेत.

Advertisement

असे आहेत तिकीट दर

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट – ३० रुपये
वनाझ ते स्वारगेट – २५ रुपये
रामवाडी ते स्वारगेट – २५ रुपये
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट – १५ रुपये
नळस्टॉप ते मंडई – २० रुपये
शिवाजीनगर ते मंडई – १५ रुपये
स्वारगेट ते मंडई – १० रुपये

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page