देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड; नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून दिल्याची माहिती आहे.

फडणवीस काय म्हणाले?

आपली बहिण चिडली असेल, तिची व्यथा असेल तर आपण समजून घेऊ, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल, तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्यामागे वेगळं असेल तर ते देखील समजून घेऊ, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना एन्ट्री देतो, कोणतीही अडवणूक आपल्या मंत्रालयात नाहीए. अशा परिस्थितीत कधी लोकं पहिल्या मजल्यावरुन जाळीवर उडी मारतात, कधी लोकं रोष प्रकट करतात याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत, असं नाहीए त्यांच्या काही अडचणी असतात. त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Advertisement

मंत्रालयात नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केली. तोडफोडीनंतर या महिलेनं घोषणाबाजीही केली. महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयात प्रवेश केला होता. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतलीय. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा आलाय. महिला पोलीस उपस्थित नसल्यानं महिलेला पकडू शकलो नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या महिलेची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page