पुण्यातील पूरस्थितीवर मुख्यमंत्र्यांच लक्ष, प्रशासनाला तातडीने दिल्या सूचना

पुणे : पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सिंहगड रोड परिसरामध्ये पाणी साचले असून एकतानगरमध्ये पाणी शिरले आहे. अग्निशमन दल, पुणे मनपा आणि प्रशासन सज्ज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्याचे परिस्थितीवर लक्ष आहे. पुणेकरांना पूरातून वाचवा आणि त्यांना अन्नाचा पुरवठा करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. धोकादायक पूर रेषाच्या आत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page