पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा अचानक रद्द; काय आहे कारण?

पुणे : परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातला असून याचा फटका शाळा, महाविद्यालयांसह नियोजित दौऱ्यांनाही बसला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. अवघ्या 2 महिन्यांवर आलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असून राष्ट्रीय नेतृत्वांचेही महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्रात अनेकदा आगमन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा जेपी नड्डा असोत, काही दिवसांत ते महाराष्ट्रात येऊन गेले आहेत.

Advertisement

आज पुन्हा पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे तसेच विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार होते. तसेच पुण्यातील तसेच एसपी कॉलेजमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तेथे ते पु्णेकरांना संबोधित करणार होते. मात्र त्यांच्या या सभेवर पावसाचे सावट घोंगावत होते. त्यामुळे अखेर मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page