पावसामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

Advertisement

पुणे शहर आणि जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर काही घरामध्ये पाणी शिरल्याच्याही घटना देखील घडल्या. तसेच या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली. बुधवारी झालेला पाऊस आणि हवामान विभागामार्फत देण्यात आलेला अंदाज या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून ‘अलर्ट जारी’

भारतीय हवामान विभागाकडून बुधवारी रात्री पावसाचा अलर्ट देण्यात आला. त्यात IMD मुंबईने म्हटले की, (दि.२६) पर्यंत पुणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे’.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page