भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उदयकुमार राय नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.

Advertisement

भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमारने फोन करून महेश लांडगे यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. अशी माहिती फोनद्वारे दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अवघ्या काही तासांत उदयकुमार रायला ताब्यात घेतले आहे.

उदयकुमार राय हा छत्तीसगडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी मध्ये राहत आहे. त्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं धमकी देण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page