मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित; सरकारला दिला इशारा

जालना : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाले आहे. नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोणीही अंतरावाली सराटी येथे येऊ नये असं आवाहन ही त्यांनी केले आहे. त्रास देणाऱ्यांना सरळ करणार. आरक्षण न दिल्यास सत्तेत बसून आरक्षण घेऊ. सलाईन घेऊन उपोषण करु शकत नाही. मागण्या मान्य झाल्या नाही तर दोष मला देऊ नका. स्वतच्या हाताने सरकार पाडून घेऊ नका. असे ही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं आहे.
गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन जरांगेंनी स्थगित केल्यानंतर त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर येत्या निवडणुकीमध्ये पाडापाडी झाली तर मला जबाबदार धरू नका असा इशारा त्यांनी दिला. तसेच मराठा समाजातील तरुणांनाही त्यांनी सल्ला दिला. मराठा तरूणांनी कोणत्याही राजकीय नेत्याच्या आणि त्यांच्या मुलांच्या पाठीशी न फिरता समाजासाठी काम करावं, आपली प्रगती करावी असंही ते म्हणाले.
दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत असा आग्रह अंतरवालीत जमलेल्या बांधवांनी केला होता. या काळात जरांगेंना दोन वेळा सलाईनही लावण्यात आली. आता त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




