रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनींचा पाठलाग करत विनयभंग; पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे : शाळेत जाणार्या अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचे प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय पिडीत मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक फैजल वहाब अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा वर्षीय शाळकरी मुलगी मैत्रिणींसोबत सोमवारी (२३ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसर भागातील ससाणेनगर परिसरातून शाळेत निघाली होती. रिक्षाचालक फैजल अन्सारी मुलीचा पाठलाग करत होता. फैजलनेे त्याचा मोबाइल क्रमांक असलेली एक चिठ्ठी मुलींमोर टाकली. त्याने तिला मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.
घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन अन्सारीला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




