बॅग तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचा मोदी, शहांवर हल्लाबोल, म्हणाले…

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळत असून सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा पार पडत आहेत. दरम्यान, अशाच एका प्रचारसभेसाठी जाताना वणी येथे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली.

Advertisement

सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची वणीमध्ये जाहीर सभा होती. या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरनं आले. यावेळी हेलिपॉडवर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. आता यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते वाशिममध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज माझ्या बॅगेची तपासणी केली, मग मोदी, शहा यांच्या बॅगा भरून येतात त्याकडे का दुर्लक्ष होतं? तपास यंत्रणांनी त्यांच्या बॅगा तपासण्याची हिंमत दाखवावी. मोदी, शहा यांच्या बॅगा महाराष्ट्रातून जाताना तपासल्या पाहिजेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page