ब्रेक फेल झाल्यामुळे पीएमपीएमएल बस घूसली पत्र्यांच्या कंपाउंडमध्ये, पुण्यातील घटना

पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील धायरी परिसरात पीएमपीएमएलच्या बसचा अपघात झाला आहे. रविवारी सकाळी हा अपघात झाला आहे. ब्रेक निकामी झाल्याने ही बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या कंपाउंडमध्ये घुसल्याची माहिती समोर आली आहे. धायरी, डीएसके आणि नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या तिठ्यावर ही घटना घडली. या बस मध्ये जास्त प्रवासी नव्हते. या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, धायरी येथील डीएसके पायथा चव्हाण बाग येथे पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक निकामी होवून अपघात झाला. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही बस धायरी येथील डीएसके येथून हडपसर भेकराईनगरकडे निघाली होती. डीएसके कडून धायरीकडे जात असताना मोठा उतार आहे. या ठिकाणी रस्ता देखील अरूंद आहे. धायरी, डीएसके आणि नांदेड सिटीकडे जाणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात. या तिठ्यावर या बसचे ब्रेक निकामी झाले आहे बसचा अपघात झाला. ही बस रस्ता सोडून थेट एका पत्र्याच्या कंपाउंड मध्ये घुसली. कंपाउंडला धडकल्यानंतर ही बस एका खड्ड्यात अडकली आणि एका झाडाला जावून धडकली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

या ठिकाणचा रस्ता तीव्र उताराचा असून अरूंद आहे. समोरून बस किंवा ट्रक सारखे मोठे वाहन आलेच तर समोरून येणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी पुरेसा रस्ताच उरत नाही. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होते. या रस्त्याचं रुंदीकरण होण्याची गरज असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. बस खड्ड्यात अडकली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page