लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आहे आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलं आहे काम…
इंडस्ट्री सोडून परदेशात स्थायिक झालेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, फोटो व्हायरल

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अभिनेत्री इंडस्ट्री सोडून संसारात रमल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘मन उधाण वाऱ्याचे’ या स्टार प्रवाहच्या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री नेहा गद्रेने करिअरच्या शिखरावर असताना २०१९ मध्ये लग्न केलं.

नेहा गद्रेने २०१९ मध्ये ईशान बापटशी विवाह केला. आता लग्नानंतर पाच वर्षांनी तिने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नेहा लवकरच आई होणार आहे.

नेहा सध्या ऑस्ट्रेलियात राहते. तेथील समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपसह फोटो शूट करत नेहाने आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली.

आता अभिनेत्रीच्या घरी मराठमोळ्या पद्धतीत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.
“माझ्या डोहाळे जेवणाचे काही फोटो” असं कॅप्शन देत नेहाने हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात नेहाने सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी नेसली होती.
“कोकीळेच्या पूजनाने वसंत ऋतूची लागते पहिली चाहूल, ईशानच्या साथीने टाकते मातृपदावर पहिले पाऊल” असा उखाणा नेहाने डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात घेतला.
नेहाने शेअर केलेल्या या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : नेहा गद्रे इन्स्टाग्राम )




